Saturday, November 20, 2010

. . . . . . . . आत-बाहेर . . . . . . . . .

. . . . . . . . आत-बाहेर . . . . . . . . .



आतमध्ये उसळणारा प्रक्षोभ शांत होईना

अंतरंगीच्या व्यथेला जखम म्हणता येईना !



आतमध्ये उसळले जे व्यक्त करता येईना

अव्यक्त जो दाह माझ्या ह्रदयास आता साहीना !



प्रकटण्या प्रस्फोट होण्या एक क्षणही राहीना

उफाळत्या भावनांना फक्त शरीर साथ देईना !



आत आणि बाहेराचा थांग कुठे लागेना

चोर आणि साव जसे एक होण्या राहीना !


अंतरीचा सूर माझा मालकंस होईना

गैर आणि आपल्याचा फरक येथे राहीना !


                                            - समीर पु. नाईक

1 comment:

  1. comments from G-Buzz !

    2 people liked this - अतुल राणे and •´¯¥¯`• ḱαʟρεṧℌ •´¯¥¯`•

    •´¯¥¯`• ḱαʟρεṧℌ •´¯¥¯`• - समीर कित्ती
    भारी आहे रे लिखाण आणि फोटो दोनीही सुंदर1:59

    sameer naik - धन्यवाद ! कल्पेश , अतुल ! :)Edit2:12

    •´¯¥¯`• ḱαʟρεṧℌ •´¯¥¯`• - Actually अरे मला ती धुरकट सावलीचा फोटो खूप आवडला2:15
    sameer naik - hummm ! माझा प्रयत्न होता आणि नेहमीच असतो मी जे लिहीले आहे ते व्यक्त करणारे फोटो असावेत .Edit3:14

    sameer naik - कल्पेश actually ? म्हणजे काय म्हणायचे आहे तुला ! ;)Edit3:21
    •´¯¥¯`• ḱαʟρεṧℌ •´¯¥¯`• - aare to photo aahe post kelas aahes tyat shevati to baghitala ki vegalach aaabhas vatto mhanun to foto jast aavadala3:22
    sameer naik - thanks ! अरे म्हंटले जरा गंमत करू तुझी ! :)Edit3:31
    •´¯¥¯`• ḱαʟρεṧℌ •´¯¥¯`• - chakka ghabaralo me 3:32 am

    ReplyDelete