Thursday, March 17, 2011

तेच...तोच...तीच... !

तेच...तोच...तीच... !




तेच शब्द तीच शाई

तोच चाफा तीच जाई !



काळजा मधील तीच व्यथा

पुन्हा पुन्हा जाळत राही !



लिहीत रहा लिहीत रहा

ह्रदय माझे टोचत राही !



पुन्हा परत तोच परिघ

तितक्याच कक्षा दाखवत राही !



नाही नाही म्हणता म्हणता

घाण्याचा मी बैल होई !



तसेच तेच होत असले

तरी त्याची भीती नाही !



आत मन टक्क जागे

माझे सारे दाखवत राही !



तेच जगणं नक्की काय

माझे मला उमगत राही !



प्रवाहाच्या बाहेर जा रे

नव्या दिशा ठायी ठायी !



- समीर पु.नाईक

8 comments:

  1. काळजा मधील तीच व्यथा

    पुन्हा पुन्हा जाळत राही !

    छान आहे कविता आवडली

    ReplyDelete
  2. आभारी आहे बंड्या ! :) ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)

    ReplyDelete
  3. छान झालीये कविता ....

    ReplyDelete
  4. धन्यवाद देवेंद्रा ! :)

    ReplyDelete
  5. Dhanyawaad Yashawant ! Blog war haardik swagat ! :)

    ReplyDelete