तेच...तोच...तीच... !
तेच शब्द तीच शाई
तोच चाफा तीच जाई !
काळजा मधील तीच व्यथा
पुन्हा पुन्हा जाळत राही !
लिहीत रहा लिहीत रहा
ह्रदय माझे टोचत राही !
पुन्हा परत तोच परिघ
तितक्याच कक्षा दाखवत राही !
नाही नाही म्हणता म्हणता
घाण्याचा मी बैल होई !
तसेच तेच होत असले
तरी त्याची भीती नाही !
आत मन टक्क जागे
माझे सारे दाखवत राही !
तेच जगणं नक्की काय
माझे मला उमगत राही !
प्रवाहाच्या बाहेर जा रे
नव्या दिशा ठायी ठायी !
- समीर पु.नाईक
तेच शब्द तीच शाई
तोच चाफा तीच जाई !
काळजा मधील तीच व्यथा
पुन्हा पुन्हा जाळत राही !
लिहीत रहा लिहीत रहा
ह्रदय माझे टोचत राही !
पुन्हा परत तोच परिघ
तितक्याच कक्षा दाखवत राही !
नाही नाही म्हणता म्हणता
घाण्याचा मी बैल होई !
तसेच तेच होत असले
तरी त्याची भीती नाही !
आत मन टक्क जागे
माझे सारे दाखवत राही !
तेच जगणं नक्की काय
माझे मला उमगत राही !
प्रवाहाच्या बाहेर जा रे
नव्या दिशा ठायी ठायी !
- समीर पु.नाईक
Sundar.....
ReplyDeleteThanks Prachi !
ReplyDeleteकाळजा मधील तीच व्यथा
ReplyDeleteपुन्हा पुन्हा जाळत राही !
छान आहे कविता आवडली
आभारी आहे बंड्या ! :) ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)
ReplyDeleteछान झालीये कविता ....
ReplyDeleteधन्यवाद देवेंद्रा ! :)
ReplyDeletekhup chan aahe... :)
ReplyDeleteDhanyawaad Yashawant ! Blog war haardik swagat ! :)
ReplyDelete