Thursday, May 28, 2026

परिक्रमा 


किर्र अंधाऱ्या रात्री तुझा स्थिर शांत डोह...

इतक्या उशीराही मला तुझ्या दर्शनाचा मोह. ...
उत्तररात्री मनामध्ये मालकंसाचे गंभीर स्वर
तुझ्या पात्रात माझ्या गात्रात स्थित नर्मदेश्वर
तुझे स्मरणही दूर करी माझ्या भास आणि भ्रमा
कधीतरी व्हावी माझी, माते तुझी परिक्रमा ||
🙏|| नमामि देवी नर्मदे ||🙏

- समीर पु.नाईक  

No comments:

Post a Comment