...........................तो !
तो अशाच एका वाटेवरती चालत होता ,अंधारलेल्या !
सोसत होता त्रास किती ,
टोचणार्या काट्यांचा,बोचणार्या वार्यांचा,
खोचक शेर्यांचा,तीक्ष्ण टोमण्यांचा,न दिसणार्या खड्ड्यांचा,
कुठूनतरी झालेल्या दगडांच्या मार्याचा.
कितीदा तरी तो पडला , गुडघे फुटले,
टाचेवरच्या भेगा अधिक गडद झाल्या,रक्ताळल्या ,
तरीही तो न थांबता अखंड चालत होता !
क्वचीत कौतूकही वाट्याला आले,तो फुशारून गेला नाही
सहानूभूती व्यक्त करणारे भरपूर ,तो ती गोंजारत बसला नाही
त्याची नजर थेट समोर होती ,
प्रलोभनांकडे तर त्याने ढूंकूनही पाहीले नाही
त्याच्या अपेक्षा कधी जन्मल्याच नाही,
इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो धडपडत होता सतत !
चालतांना इतरांना सोबत घेण्याचा त्याने प्रयत्न करून पाहीला,
त्याला थोडं उशीरा लक्षात आलं,प्रत्येकाची वाट वेगळी आहे,
शक्य त्याला मदत करत चालत राहीला,तीव्र अंधारात
कारण ती वाट होती त्याच्या ध्येयाकडे जाणारी ,
त्याच्या आयुष्याला अर्थ देणारी !
एक दिवस तो त्या वाटेच्या टोकाला पोहोचला,
त्याच्या कष्टांचे सार्थक झाले, त्याचे ध्येय साध्य झाले
तो तिथेच थांबला पूर्ण विचार करून ,
जिथून त्याने प्रवास केला तिकडे तोंड करून
आणि ती अंधारी वाट अचानक उजळून गेली
कारण त्याच्या नंतर येणार्यांसाठी तो प्रकाश झाला होता !
- समीर पु. नाईक
No comments:
Post a Comment