Friday, October 29, 2010

सत्यदर्शन

सत्यदर्शन

भय कोठून दाटून आले

वास्तव अनपेक्षीत होते

सत्याचे ते निष्‍ठूर दर्शन

माझे काळीज जाळीत होते



संकटांचे भीषण पर्वत

खदाखदा ते हासत होते

मना ज्यांचाच विश्वास होता

आज ते गळा कापत होते



मन माझे अगतिकतेने

केविलवाणे ते झाले होते

धाव धाव रे जगदाधीशा

तुज वाचून नच कोण ते



                                      - समीर पु. नाईक

1 comment:

  1. Some compliments from Google Buzz -
    3 people liked this - अतुल राणे, प्राची वाडेकर and •´¯¥¯`•'कल्पेश मोहिते'•´¯¥¯`•

    1}अतुल राणे - chaaan re......! mastach....!12:53 sameer naik - Thanks Atul !Edit1:00

    2}प्राची वाडेकर - tooo gud 1:52
    sameer naik - Thanks Prachi !Edit2:03

    previous comments from अतुल राणे, sameer naik, प्राची वाडेकर and 1 other

    3}•´¯¥¯`•'कल्पेश मोहिते'•´¯¥¯`• - समीर पुढील साहित्यकार तूच मला अतिशय आवडलं 4:32
    sameer naik - अरे बाबा !!! घाबरवू नकोस , दडपण येईल माझ्यावर ! :) असो, धन्यवाद !Edit5:23

    ReplyDelete