स्वप्नांच्या प्रत्यक्षाची लावून गेला आस
उठ म्हणाला, नूसती बघू नकोत स्वप्नं
जागेवरती बसूनच सर्व काही जपणं
सुरूवात कर लगेचच हीच योग्य वेळ
विचारपुर्वक कर सारे,सगळा घालून मेळ
वाया नको काहीही वापर क्षण न क्षण
योग्य आहे तेच , तू आता कर पण
काहीही न करता काहीच मिळत नाही
प्रयत्न जितके तुझे तितकेच यश पाही
नशीब तुला मदत करेल तेंव्हाच फक्त मित्रा
प्रयत्नांच्या पराकाष्ठेची भरवशील जेंव्हा जत्रा
संघर्ष तर असेलच पावलोपावली जिथे
लढा अखंड ठेवलास तर तगशील तिथे
यातून कणखर होशील पोलाद बनेल मन
कळेल तुला यातून अखेर काय जगाचे रण
यश मिळेल खरं जिथे सुरूवात करशील
प्रयत्नांवर प्रयत्न सातत्य जिथे ठेवशील
एकच ध्यास धरशील जेंव्हा सारे सोडून पाठी
जग मदत करेल सारे तुला जिंकण्यासाठी
- समीर पु. नाईक
समीर,
ReplyDeleteपल्ला गाठणं वगैरे झंझट मागे लावून घेशील तर तू तुझ्या लिखाणात कधीच समाधानी राहणार नाहीस. कोणाशी तुलना करू पाहिलीस तर नाहीच नाही.
लिहीण्याची स्टाईल माझी वेगळी, तुझी वेगळी, इतरांची वेगळी.एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तुझा दृष्टीकोन वेगळा, माझा वेगळा. त्यामुळे लिखाण वेगळं वेगळंच राहणार. मग ते कोणाला आवडेल, कोणाला नाही आवडणार. पण ते ’तुझे’ असेल, ’ओरिजिनल’ असेल, आणि मेबी, त्यातून तू आणखी प्रगल्भ होत जाशील. I just hope की तू कमेंटच्या संख्येवरून तुझं लिखाण चाचपत नाहीयेस. फ़क्त मनापासून लिहीत राहा. सगळं आपोआपच जमतं. इतकंच नाही तर लोकांना ते भावतं सुद्धा. कारण आपल्या मनातलं तेच चार लोकांच्या मनातलं असतं.
फ़क्त एक सूचना, बघ तुला पटली तर, नाहीतर सोडून दे, कवितांच्या बाजूला तू खूप इमेजेस लावतो आहेस. त्यापाठी काही कारण आहे का?तुझ्या कवितांचा अर्थ हा शब्दांमधून पोहोचला पाहिजे, पण या इमेजेस वाचकाला त्यांचा त्यांचा अर्थ घेण्यापासून परावॄत्त करतायेत. तुझ्या कवितेपेक्षा जास्त लक्ष त्याच वेधून घेतायेत. आणि असंही होतंय की तुला अभिप्रेत असलेला अर्थच वाचकाने घ्यावा यासाठी तू वाचकाला भाग पाडतोयेस. असं होता कामा नये. नाही का? तुझ्या कवितेतून त्याला कळलेला अर्थ घेण्याची लिबर्टी त्याला असलीच पाहिजे असं मला वाटतं. बघ तुला काय वाटतंय ते.
शुभेच्छा.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteश्रध्दा ! :)
ReplyDeleteलिखाणाच्या बाबतीत तूम्ही जे काही म्हंटले आहेस ते सर्व १००% मान्य ! फक्त एक गोष्ट, मी तूलना करत नाहीये तर , नवे आयाम तपासून पाहतोय , ज्यातून माझे वेगळे , ओरिजिनल लिखाण अधिकच प्रगल्भ होत राहील. comments च्या संख्येवरून नक्कीच माझे लिखाण चाचपत नाहीये , नाहीतर 0 comments असतानाही मी पुढे पोस्टस टाकत राहिलो नसतो. मनापासून लिहीण्याचा अखंड प्रयत्न नक्कीच असेल.
कवितांना लावलेल्या इमेजेस च्या बाबतीत हे एकदम मान्य की त्या जरा जास्तच होत आहेत , ते माझ्याही मनात आलं होतं पण मी थोडं दूर्लक्ष केलं , कवितेचा मला अभिप्रेत असणारा अर्थ त्यातून उलगडावा हे मनात होतं खरं, पण आपण भाग पाडतोय असं काही मनात आलं नव्हते. स्वत:चा अर्थ घेण्याची लिबर्टी वाचकाला असलीच पाहिजे ... यापुढे मी त्या बाबतीत नक्कीच काळजी घेईन. मनापासून दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी आभार ! आणि ब्लॉगवर सहर्ष स्वागत !:)
wa mast ahe...
ReplyDeleteहॄषीकेश ! ब्लॉगवर आपले स्वागत ! अभिप्रायासाठी मनापासून आभारी आहे. ! :)
ReplyDelete