शब्दांचा देई हात
चित्प्रकाश ह्र्दयात
एकेका अक्षरात
उभा माझा रमानाथ !
शब्द देई वेगळाले
चैतन्यच साक्षात
एकेका अक्षरात
उभा माझा रमानाथ !
शब्द देई अर्थवाही
शब्द-अर्थ दूधभात
चेतनेची एक वात
एकेका अक्षरात
उभा माझा रमानाथ !
शब्द देई भव्यपूर्ण
अर्थाचा आधारभूत
चिन्मय तो एक नित्य
एकेका अक्षरात
उभा माझा रमानाथ !
शब्द देई लिहीण्यास
अर्थ जणू अवकाश
चिद्घन तो अज्ञात
एकेका अक्षरात
उभा माझा रमानाथ !
सृजनाची देई शक्ती
निर्मितीचा निमित्तमात्र
पाठीवर देई थाप
एकेका अक्षरात
उभा माझा रमानाथ !
- समीर पु. नाईक
पुर्वप्रसिध्दी " मोगरा फुलला दिवाळी अंक २०१० "
Comments from G-Buzz-
ReplyDelete2 people liked this - झम्प्या झपाटलेला and •´¯¥¯`•'कल्पेश मोहिते'•´¯¥¯`•
•´¯¥¯`•'कल्पेश मोहिते'•´¯¥¯`• - sameer sahi
sameer naik - Thanks Kalpesh !Edit
sameer naik - Thanks Zampya !EditNov 19