कधी कोण आम्हा पुसे काय केले
असे मोठे काय हे कर्तृत्व असले ?
इथे ना स्वयंभू कुणी जन्मलेले
इथे ना कुणी विहंगातून आले
कुणी ना इथे सर्वही प्राप्त केले
कुणालाही कोठे आपोआप आले
कुणा वाजवू द्या, नगारे दुदूंभी
कुणा दाखवू द्या जगाला कितीही
जरी आम्ही केलेले झाकोळले ते
जरी ना कुणाच्याही लक्षात आले
वाट्यास आली कितींना उपेक्षा
ना ढळले ,ना चळले,कितीही प्रतीक्षा
नव्या कल्पनांना सुळाचीच हाक
जूने सत्य शाबूत, दाबून नाक
जसा सूर्य गेला ढगाआड जेंव्हा
नाही अस्त झाला, जरी वाटे तेंव्हा
अहो फेकलेला जरी कोळसा तो
वर्षांनी किती एक हिरा मात्र होतो
आम्हा ठाम विश्वास केले जेही आम्ही
कळाया तुम्हाला नाही पात्र तुम्ही
नव्हे स्व:स्तूती ही, असे स्व:त्वजाण
नव्हे वल्गना या , असे आत्मभान
हा नाही तुमचा अपमान केला
दिला हाती फक्त वास्तवाचा प्याला
- समीर पु.नाईक
प्रेरणादायी कविता...खुप खुप आवडली....!
ReplyDeleteदवबिंदू ! मनापासून आभार आणि ब्लॉगवर आपले स्वागत !
ReplyDelete