Wednesday, August 24, 2011

उठ , उठ , चालत रहा ........................


उठ , उठ , चालत रहा ........................
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

जग पक्कं स्वार्थी बघ
पडला तरी हसून मग
खवचट शेरे , कुजकट टोमणे
दाखवून दे रक्तातील धग
तुझी वाट शोधून त्यावर
नव्याने रस्ता बांधून काढ
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

रस्त्यावर लाव झाडं अनेक
कर्तृत्व-मोहोर असलेली
जप त्यांना , वाढू दे ती
फळांना कीड नसलेली
मग बहर- वसंत येईल
स्थिर-स्थावर आयुष्य होईल
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस

यशाच्या त्या शिखरावरती
सदैव राहा सावध फार
समोर नजर , आभाळी हात
पाय मात्र जमिनीवर
नकोस करू कुणाशी खार
ध्यानात ठेव इतकंच सार
उठ , उठ , चालत रहा
पडला तरी थांबू नकोस
पुन्हा टाक नवं पाऊल
जगाला कारणं देऊ नकोस
                   
                   - समीर पु.नाईक

2 comments:

  1. सुंदर विचार ,सुंदर मांडणी ...प्रेरणादायी कविता ...मस्तच

    ReplyDelete
  2. सुंदर अभिप्राय ... ;) आभार्स देवेंद्रा !

    ReplyDelete