Monday, November 29, 2010

माझे मीपण, माझे मीपण !

माझे मीपण, माझे मीपण !
अलगद , अवचित असलेले

अ‌न अनंत रेषा पुसलेले

जे तरीही आहे उरलेले ते

माझे मीपण, माझे मीपण !नकळत येई जे ओठांवर

डोकावत अन क्षणाक्षणातून

केंव्हा कधीही कुठेही उमटे

माझे मीपण, माझे मीपण !लपंडाव ते राही खेळत

शोधाया मी जातो जेंव्हा

अचानक अन समोर येई

माझे मीपण, माझे मीपण !प्रकटे केंव्हा अनपेक्षित ते

अहंकार मी लपवत आलो

नाही लपले , नाही मिटले

माझे मीपण, माझे मीपण !उलगडलेले नाही मजला

माझे मोठे कोडे अवघड

व्यक्तातून ते उमलत अनवट

माझे मीपण, माझे मीपण !नेणीवेतून येते अवखळ

देई मजला ओळख अवघी

ज्यातून कळले कोण मी अन

माझे मीपण, माझे मीपण !

- समीर पु.नाईकFriday, November 26, 2010

कर्तृत्व-वास्तव

कर्तृत्व-वास्तव


कधी कोण आम्हा पुसे काय केले

असे मोठे काय हे कर्तृत्व असले ?इथे ना स्वयंभू कुणी जन्मलेले

इथे ना कुणी विहंगातून आलेकुणी ना इथे सर्वही प्राप्त केले

कुणालाही कोठे आपोआप आलेकुणा वाजवू द्या, नगारे दुदूंभी

कुणा दाखवू द्या जगाला कितीहीजरी आम्ही केलेले झाकोळले ते

जरी ना कुणाच्याही लक्षात आलेवाट्यास आली कितींना उपेक्षा

ना ढळले ,ना चळले,कितीही प्रतीक्षानव्या कल्पनांना सुळाचीच हाक

जूने सत्य शाबूत, दाबून नाकजसा सूर्य गेला ढगाआड जेंव्हा

नाही अस्त झाला, जरी वाटे तेंव्हाअहो फेकलेला जरी कोळसा तो

वर्षांनी किती एक हिरा मात्र होतोआम्हा ठाम विश्वास केले जेही आम्ही

कळाया तुम्हाला नाही पात्र तुम्हीनव्हे स्व:स्तूती ही, असे स्व:त्वजाण

नव्हे वल्गना या , असे आत्मभानहा नाही तुमचा अपमान केला

दिला हाती फक्त वास्तवाचा प्याला
 - समीर पु.नाईक

Saturday, November 20, 2010

. . . . . . . . आत-बाहेर . . . . . . . . .

. . . . . . . . आत-बाहेर . . . . . . . . .आतमध्ये उसळणारा प्रक्षोभ शांत होईना

अंतरंगीच्या व्यथेला जखम म्हणता येईना !आतमध्ये उसळले जे व्यक्त करता येईना

अव्यक्त जो दाह माझ्या ह्रदयास आता साहीना !प्रकटण्या प्रस्फोट होण्या एक क्षणही राहीना

उफाळत्या भावनांना फक्त शरीर साथ देईना !आत आणि बाहेराचा थांग कुठे लागेना

चोर आणि साव जसे एक होण्या राहीना !


अंतरीचा सूर माझा मालकंस होईना

गैर आणि आपल्याचा फरक येथे राहीना !


                                            - समीर पु. नाईक

Friday, November 19, 2010

! अशांत !

! अशांत !


अलिकडेच झालो आहे

रूक्ष-शूष्क यंत्र मी

भावनांच्या कल्लोळातही

संवेदनाहीन शांत मीरोजचे सारेच आहे

रोजचाच तोच मी

वेदना रोजच्याच त्याही

संवेदनाहीन शांत मीबेगड्या गर्दीत सार्‍या

अस्वस्थ श्‍वास आणि मी

अपेक्षांचे पर्वत तरीही

संवेदनाहीन शांत मीरक्‍त आटतेच आहे

कोरडाच राही मी

सत्व संपले येथ

संवेदनाहीन शांत मीआत उरल्याच इच्छा

अंतपार एक मी

काय मजला करायचे होते

आता उरलो अशांत मी- समीर पु. नाईक

पुर्वप्रसिध्दी " मोगरा फुलला दिवाळी अंक २०१० "

Thursday, November 18, 2010

! एकेका अक्षरात !

! एकेका अक्षरात !


शब्दांचा देई हात

अर्थांची रम्य साथ

चित्प्रकाश ह्र्दयात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !शब्द देई वेगळाले

अर्थाचा जणू कांत

चैतन्यच साक्षात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !शब्द देई अर्थवाही

शब्द-अर्थ दूधभात

चेतनेची एक वात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !शब्द देई भव्यपूर्ण

अर्थाचा आधारभूत

चिन्मय तो एक नित्य

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !शब्द देई लिहीण्यास

अर्थ जणू अवकाश

चिद्‍घन तो अज्ञात

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !सृजनाची देई शक्‍ती

निर्मितीचा निमित्‍तमात्र

पाठीवर देई थाप

एकेका अक्षरात

उभा माझा रमानाथ !- समीर पु. नाईक

पुर्वप्रसिध्दी " मोगरा फुलला दिवाळी अंक २०१० "

Monday, November 1, 2010

तुझी वाट पाहताना ..................

तुझी वाट पाहताना ..................
चातक झालाय माझा

तुझी वाट पाहताना

जणू तू आलीच आहेस

अशी कल्पना करून बघताना !प्रतीक्षेचा क्षण आणि क्षण

किती मोठा असतो नाही

स्वत: प्रतीक्षा केल्याशिवाय

तुला हे कळणारच नाही !आता येशील, तेंव्हा येशील

अशी मनाची समजूत घालतोय खरी

पण हुरहूर आता वाढत चाललीय

ही गोष्ट सुध्दा तेव्हढीच खरी !जणू तू समोरच आहेस

असं समजून घेताना

पापण्या मिटतच नाहीत डोळ्यांच्या

तुला साठवून घेताना !केंव्हाची मी वाट पाहतोय

आता आर्त साद घालतोय

जन्मजन्मांतरीच्या सोबतीसाठी

फक्त तुझाच हात मागतोय !- समीर पु.नाईक