Thursday, March 17, 2011

तेच...तोच...तीच... !

तेच...तोच...तीच... !
तेच शब्द तीच शाई

तोच चाफा तीच जाई !काळजा मधील तीच व्यथा

पुन्हा पुन्हा जाळत राही !लिहीत रहा लिहीत रहा

ह्रदय माझे टोचत राही !पुन्हा परत तोच परिघ

तितक्याच कक्षा दाखवत राही !नाही नाही म्हणता म्हणता

घाण्याचा मी बैल होई !तसेच तेच होत असले

तरी त्याची भीती नाही !आत मन टक्क जागे

माझे सारे दाखवत राही !तेच जगणं नक्की काय

माझे मला उमगत राही !प्रवाहाच्या बाहेर जा रे

नव्या दिशा ठायी ठायी !- समीर पु.नाईक

8 अभिप्राय/comments:

इंद्रधनू said...

Sundar.....

Unique Poet ! said...

Thanks Prachi !

BinaryBandya™ said...

काळजा मधील तीच व्यथा

पुन्हा पुन्हा जाळत राही !

छान आहे कविता आवडली

Unique Poet ! said...

आभारी आहे बंड्या ! :) ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)

davbindu said...

छान झालीये कविता ....

Unique Poet ! said...

धन्यवाद देवेंद्रा ! :)

Yashwant Palkar said...

khup chan aahe... :)

Unique Poet ! said...

Dhanyawaad Yashawant ! Blog war haardik swagat ! :)

Post a Comment