Friday, April 22, 2011

! सचिन देवाची आरती !


http://www.mimarathi.net/node/5925 इथे सचिन च्या कामगिरी विषयी काही मौलिक विचार , प्रतिसाद , मतमतांतरे वाचनात आले.... त्या वरून रचलेली ही आरती...!
सचिन देवाची आरती !
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
कुणी म्हणे तुमची सेंच्युरी नको
भारत हरतो म्हणे खात्रीने लेको
नर्व्हस नाईंटी, दहा-पंधरा धावा
एवढ्याच तुम्ही काढाव्या देवा
तेंव्हा इतर खेळतील मोठ्या भक्ती भावा...
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
एकवीस वर्षे वाट पाहिली तुम्ही देवा
वर्ल्डकप जिंकायाला धोनीच हवा
तुमचे कौतुक करता दोष लागती
महापातकांचे डोंगर उभे राहती
व्यक्तीपूजक म्हणूनी लोकं हिणविती देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
आकडेवारी ती दाखवूच नका
स्टॅटीस्टिक ते इंद्रजाल बघा
सांघिक यश ते खरे यश देवा
मॅन ऑफ दि मॅच चा नका खाऊ मेवा
आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा
जय देव जय देव जय सचिन देवा
तुमचे नी प्रसादे भारत विजयी व्हावा !!
जयदेव जयदेव....
- समीर पु.नाईक

11 comments:

 1. :) अगदी दिसून येतेय हा तुझी भक्ती ह्या तुझ्या आरतीतून ! :)

  ReplyDelete
 2. :D तुम्हांला लक्षात आले अनघाताई .....

  ReplyDelete
 3. >> आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा

  परफेक्ट षटकार :D

  ReplyDelete
 4. :D हेरंबदा ! षटकारास अचूक पावती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद !

  ReplyDelete
 5. आणि हो ! हेरंबदा ! ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :)

  ReplyDelete
 6. कविता ही कला आहे... सर्वांना त्ती जमेलच असे नाही... मला नाही जमत... तुम्हाला मात्र छान अवगत आहे ती असे वाटतेय :)

  ReplyDelete
 7. अरे वाह.... ही आरती वाचली होती म्हणा मी मराठीवर पण आज परत वाचतोय तुमच्या ब्लॉगवर... मस्त जमलीय

  आत्मा शून्य झाला आमुचा तो देवा ...

  :D :D

  ReplyDelete
 8. मी आपल्या काही कविता वाचल्या आहेत......... माझ्या मते कविता हे कमी शब्दात नेमक्या भावना समर्थपणे व्यक्त करणारे माध्यम आहे.... तुमच्या कविता निश्चितच छान आहेत..... आपण मला दिलेल्या complement साठी मनापासून आभारी आहे.... काही वेळा जमून जातात माझ्या कविता... ;)

  ReplyDelete
 9. बघा यांनीही म्हंटलंय मस्त ’ जमलीय ’ म्हणून ... :D.......

  सुहास पुन्हा एकदा आभार......

  ReplyDelete
 10. वाचतानाच आरती म्हटल्याप्रमाणे सूर लागतोय हे तुझ यश आहे...
  मस्तच मित्रा...!

  ReplyDelete
 11. आभार्स देवा ...त्या लिंक वर लोकांनी बरेच तारे तोडले होते.... त्यावरून रचली....
  आणि आरती रचताना माझ्या डोळयासमोर श्रीसमर्थ रामदास स्वामींनी रचलेली श्रीमारूतीरायाची ही आरती होती....

  सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी
  करी डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी
  कडाडीले ब्रह्मांड डाके त्रिभुवनी
  सुरवर नर निशाचर ज्या झाल्या चरणी
  जय देव जय देव जय श्री हनुमंता
  तुमचे नी प्रसादे नभी ये कृतांता
  जय देव जय देव

  दुमदुमले पाताळ उठीला प्रतिशब्द
  थरथरला धरणीधर मानीला खेद
  कडालिले पर्वत उड्गण उच्छेद
  रामी रामदासा शक्तीचा शोध
  जय देव जय देव जय श्री हनुमंता
  तुमचे नी प्रसादे नभी ये कृतांता
  जय देव जय देव


  त्यात मी फक्त माझे शब्द बसवले... :)

  ReplyDelete