Tuesday, April 26, 2011

आता...............................


आता...............................

आता इथे ऊन पडेल
काळोखाचे राज्य सरेल
युगानयुगे अंधारात
विचारांच्या जंजाळात
मरगळलेल्या मनांमध्ये
आता कुठे जीव शिरेल
आता इथे ऊन पडेल

आले गेले झंझावात
नुसती आशा,कुठे वाट ?
स्वार्थी सारे बांडगुळ
त्यापेक्षा बरा आमचाच सूळ
तगमगलेल्या मनांसाठी
आता पूर्ण शांती उरेल
आता इथे ऊन पडेल

आम्ही केवळ रातकिडे
फक्त फक्त किरकिर घडे
अहोरात्र अंधारयुग
लढून भांडूनही उजेड सुख ?
काळ्या तमाचे अभेद्य कोट,तरी
आता त्यांचे राज्य सरेल
आता इथे ऊन पडेल

कारण आता आले भान
प्रकाशाचे रूप ज्ञान
गोठलेल्या संवेदनांना
जाणीवांनी दिले प्राण
खोलखोल सर्वदूर दिवा सारा
अंधाराच्या अज्ञानाला नाही थारा
आता इथे ऊन पडेल
काळोखाचे राज्य सरेल
                 - समीर पु.नाईक

8 comments:

 1. धन्यवाद प्राची ! :)

  ReplyDelete
 2. mastttt!!! :) avadli!!! :)

  ReplyDelete
 3. मनापासून धन्यवाद प्रिया...!:)
  ब्लॉगवर सहर्ष स्वागत ..! :)

  ReplyDelete
 4. सुंदर, खुप आवडली :)

  ReplyDelete
 5. आभारी आहे सुहास .... :)
  ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत ! :)

  ReplyDelete
 6. एक चांगली आशावादी कविता ...आवडली...!

  ReplyDelete
 7. मनापासून धन्स...! देवा ! :)

  ReplyDelete