Thursday, July 14, 2011

मी !


मी !
मला संताप येत नाही
कसलाही
आजूबाजूला कितीही बॉंम्बस्फोट
घडोत
माझं रक्त नाही येत
सळसळून !
दोन, चार , पंधरा , साठ
कितीही माणसं मेली
आणि शेकडो जण जखमी
तरी मी त्याच निर्विकारपणे
पुढची बातमी वाचतो
सरकार बॉंम्बस्फोटचा तपास
सी.बी.आय. कडे सोपवते
नेहमीप्रमाणेच
व्यक्त करते चिंता दहशतवादाबद्दल
आणि केला जातो निर्धार
नेहमीप्रमाणेच
काल गुजरात आज दिल्ली
आणखी कुठे ?
उद्या इथे परवा तिथे
तरीही मला फरक पडत नाही
मी शांत असतो तेव्हढाच वरतून
आत धुमसतो, अस्वस्थ होतो
कदाचित कुठे मळमळ व्यक्त होतेही
तेव्हढयापुरतीच !
फक्त एव्हढ्यावरच मी लढतो
दहशतवादाशी.....
मी या विराट समाजाचाच
एक भाग आहे !!
मुखवटे चढवलेले काही
घडवतात स्फोट
गर्दीची ठिकाणं हेरून
जात-पात,धर्म,पंथ,देश
यांच्याशी कुणाला घेणं आहे ?
मुखवटेही या विराट समाजाचाच
एक भाग आहेत !!
आता फक्त भीती मनात
भिनत चाललीये पार
स्वतःच्या साकळत चाललेल्या
जाणिवेची...........
- समीर पु.नाईक
..

6 comments:

  1. देवा ! :( आपल्या लढण्याचा असाही मार्ग !

    ReplyDelete
  2. आता फक्त भीती मनात
    भिनत चाललीये पार
    स्वतःच्या साकळत चाललेल्या
    जाणिवेची......

    दुर्दैवाने ही खरी परिस्थिती आहे...आणि म्हणून आता समोर जरी काही घडलं तरीही पटकन कोणी मदतीला येत नाही...
    सगळी मनं मेलेली आहेत....मेलेला समाज...
    हम्म्म्म

    ReplyDelete
  3. अनघाताई! मनं मेलीत .... असंच नाही.... पण निब्बर झालीत..... किंबहुना भित्री सुध्दा !

    ReplyDelete
  4. Very depressing.... but very true... कविता पटली हं :)

    ReplyDelete
  5. प्रतिसादासाठी आभार आणि ब्लॉगवर स्वागत श्रीराज !:)

    ReplyDelete