Friday, January 20, 2012

कविता............-१तूच गेलीस दुर अचानक
कोणताही मागमूस ना
पाऊलखुणा नसलेल्या
त्या वाटा अवघ्या पुसलेल्या
जागोजागी शोधून पाहता
खाणाखूणा मिटलेल्या
स्वप्नांमध्ये मधेच कुठूनी
काचा खसकन घूसलेल्या

पण आशा माझ्या
तितक्या कणखर
खोलखोल त्या
रूतलेल्या.......
शोधत येईन , थांब जरा तू
अवचित वाटा दिसलेल्या
इच्छांपुढती मार्गच नमती
हजार युक्त्या सुचलेल्या
मिटले मधले अंतर सारे
तशात कविता स्फुरलेल्या.....

          - समीर पु. नाईक

4 comments:

  1. अतिशय सुरेख कविता समीर ...हि माझी पहिलीच भेट आपल्या ब्लॉग वर...छान वाटलं...भरपूर शुभेच्छा .... भेटतच राहू :)

    ReplyDelete
  2. धन्यवाद परिचित ! :) आपले मनापासून स्वागत ..... शुभेच्छांकरिता आभार ... आपल्यालाही भरघोस शुभेच्छा... आणि भेटत तर राहूच... :)

    ReplyDelete
  3. Where are you bhai? Parat yaa, tumachya kavitanchi vaat pahatoy.

    ReplyDelete