Monday, October 31, 2011

*आयुष्याची परिभाषा....*
माझे मजला छळत राहते , अबोल क्रंदन मौनाचे
संदर्भांचे माग जिव्हारी  , पुसट शोधतो स्वप्नांचे 

असे स्वातीचे थेंब कोणते , जगता जगता निसटून जावे
मनात नाजूक कोष विणावे , अन कोठे जगण्यात झूरावे

अशाच वेळी कसे उमगले , हे अडणारे कोडे
चौकटीतच गच्च बसवले , जगणे...चौकटीला मोडॆ 

चेहर्‍यावरती हसून थोडे ,  आनंदाची वाटावी गाणी
काही स्वप्ने भिरभिरणारी , हळूच अलगद कवेत घ्यावी

रंगाचे फटकारे ओढून , रंगवावे रंगांना केंव्हा
पाण्याला पाजावे पाणी , खळखळत्या ओढ्याचे जेंव्हा

प्राजक्ताचे सडे सभोवती , फुले तुजवरी उधळावी
तुझीया कुरळ्या केसांमध्ये , जागोजागी माळावी

झोकून द्यावे स्वत: स्वत:ला , मुक्त मोकळ्या अवकाशी
साकारावे गुज मनीचे , जपून ठेविले हृदयाशी
कळली मजला थोडी आहे , आयुष्याची परिभाषा
पुन्हा ओढल्या हाताने या , हातावरती नवरेषा 
                         
                                     - समीर पु. नाईक

8 comments:

 1. नेहमीप्रमाणे मस्तच ....
  >>>कळली मजला थोडी आहे , आयुष्याची परिभाषा
  पुन्हा ओढल्या हाताने या , हातावरती नवरेषा

  हे खूप आवडलं.

  ReplyDelete
 2. मनापासून धन्स देवेंद्रा...! :)

  ReplyDelete
 3. मस्त आहे रे कविता ...

  ReplyDelete
 4. धन्यवाद अनामिक......! :)

  नाव तरी टाकायचे ....... प्च !

  ReplyDelete
 5. Thanks Anagha! :) baryach diwasanni aalis.... !

  ReplyDelete
 6. छान आहे कविता!

  ReplyDelete
 7. मनापासून धन्यवाद मनाली ! :)
  ब्लॉगवर सहर्ष स्वागत ! :D

  ReplyDelete