Monday, November 29, 2010

माझे मीपण, माझे मीपण !

माझे मीपण, माझे मीपण !
अलगद , अवचित असलेले

अ‌न अनंत रेषा पुसलेले

जे तरीही आहे उरलेले ते

माझे मीपण, माझे मीपण !नकळत येई जे ओठांवर

डोकावत अन क्षणाक्षणातून

केंव्हा कधीही कुठेही उमटे

माझे मीपण, माझे मीपण !लपंडाव ते राही खेळत

शोधाया मी जातो जेंव्हा

अचानक अन समोर येई

माझे मीपण, माझे मीपण !प्रकटे केंव्हा अनपेक्षित ते

अहंकार मी लपवत आलो

नाही लपले , नाही मिटले

माझे मीपण, माझे मीपण !उलगडलेले नाही मजला

माझे मोठे कोडे अवघड

व्यक्तातून ते उमलत अनवट

माझे मीपण, माझे मीपण !नेणीवेतून येते अवखळ

देई मजला ओळख अवघी

ज्यातून कळले कोण मी अन

माझे मीपण, माझे मीपण !

- समीर पु.नाईकNo comments:

Post a Comment