Saturday, December 25, 2010

तुला पाहताना...............

ही माझ्या सुरूवातीच्या कवितांपैकी एक !
तुला पाहताना...............तुला पाहताना धुंद फुलला केवडा

तुला पाहताना होई प्राजक्ताचा सडा

तुला पाहताना निशिगंध मोहरला

तुला पाहताना ऋतू बहर बावरातुला पाहताना भान हरपले माझे

तुला वर्णताना शब्द हरवले माझे

तुला पाहताना मन गुंतले ग माझे

तुला पाहताना चांदणे सुध्दा फिके                तुला पाहताना अंगी रोमांच उठले

गंध तुझा येताक्षणी श्वास श्वास हे फुलले

तुला पाहताना तुझा कटाक्ष हा असा

झाला झाला ग सखये जीव माझा वेडापिसा

तुला पाहण्याचा छंद लागला ग मला

तुला पाहताना सार्थ झाल्या ग गझला

कधी येशील ग सखे , हुरहूर मला लागे

वाट तुझी पाहताना , नेत्र रात्रंदिन जागे .

- समीर पु. नाईक

2 comments:

  1. सुंदर! अप्रतिम कविता केली आहे.

    तुला पाहताना अंगी रोमांच उठले

    गंध तुझा येताक्षणी श्वास श्वास हे फुलले

    ReplyDelete
  2. रविंद्रजी ! अभिप्रायासाठी मनापासून आभार आणि ब्लॉगवर स्वागत ! :)

    ReplyDelete