का रे नाही जाताना तू पाहीलेस मज एकदाही पण
आले असते, धावत मीही, विसरून सारे भळभळते क्षण
शेवटसंधी आता नाही,आता केवळ हळहळते मन
सलणारा तो काटा ह्रदयी डोई पडती घणघणते घण
विसरू आपण, वाटे सोपे, आता कळले अवघडलेपण
काय करू मी सांग सख्या रे, तूच छळतो आताही मज
अबोल दिसले वरून कितीही,मनात आहे रणरणते रण
सावरणारा तूच असा रे गेला निसटून हातातून पण
पाणी डोळा दाटू आले , कातर आशा केव्हढीही बघ
परतून येशी म्हणून तू रे,जागी आहे केंव्हाची अन
- समीर पु.नाईक




मराठी माणसांचे आपले हक्कांचे मी मराठी संकेतस्थळ ! ८२०० लेख, १९०० सदस्य व अनेक सोयींनी युक्त असे मराठी संकेतस्थळ !
0 अभिप्राय/comments:
Post a Comment