Thursday, September 2, 2010

! संचित !

        ! संचित !


वार्‍या वरती केस भुरभूरे

उभी ही नव यौवना

सलज्जतेचे रंग लेऊनी

स्वप्न नवे लोचना !प्रसन्नतेचे तेज पसरवी

भाळून भास्कर चेहर्‍यावरती

हिरवा शालू आणिक त्यावर

लावण्याची गर्जत महतीसौंदर्याची रेखीव पुतळी

कनक तुझ्या त्या अंगावरती

रूपाने जे तूझ्या झळाळे

आभा जणू ही तूझीच भोवतीअवखळ तुझे रूप मनोहर

त्यावर अंगठा दुमडून किंचीत

मुग्ध कळी ती नाजुक सुंदर

कुणाच्या भाळी हे संचित ?

                          - समीर पु. नाईक

3 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. वा! फोटो पाहून कविता सुचली की कवितेला समर्पक असा फोटो मिळाला, हे सांगणं कठीण. दोन्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहेत.

  ReplyDelete
 3. धन्यवाद आणि स्वागत ! कांचन ताई !
  आप हमारे ब्लॉग पर पधारे दिल गार्डन-गार्डन हो गया ! :D
  ही कविता फोटो पाहूनच सुचली आहे. येथे तुम्हाला आणि सर्वांनाच नेहमी यायला आवडावे याचा मी पुर्ण प्रयत्‍न करेन ; करतो आहे , माझा ब्लॉग मोगरा फुललास जोडल्या बद्द्ल धन्यवाद आणि सदीच्छा !

  ReplyDelete