Wednesday, September 29, 2010

मन , स्वप्न , मी...........!

मन , स्वप्न , मी...........!मन खुळे माझे, धावे स्वप्नांपाठी

की स्वप्न वेडे माझे,मनाचे सांगातीमी पुसले मनाला, खरे आहे कारे

ते ही सांगे स्वच्छ,स्वप्न आहे सारेआता मोठा प्रश्न, मन असे का करावे

जाणूनिया सर्व,तरी हिंडत फिरावेस्वप्न सांगे मला ,माझे दिवाने जग

मन तुझे तरी, मागे राहील कसे मगसांग स्वप्ना तुच,मन माझेही ऎकेना

प्रयत्‍न किती जरी ,मना जिंकता येईनामन विचारी मला,जिंकण्याची काय व्याख्या

ती तर संदिग्ध आहे,अरे माझ्या सख्यास्वाधीन आहे कारे, मी तुझेच ना मन

माझ्या अधीन सारे, भ्रमात किती जणस्वप्ने आहेत म्हणून आहे बरं का जग

विचार कर राजा,नीट डोळे उघडून बघगोंधळ झाला माझा,मना आले मोठे हसू

चल मित्रा माझ्या,स्वप्नांच्या नावेत बसू


                                             -  समीर पु.नाईक

No comments:

Post a Comment