Tuesday, August 17, 2010

! कवी !

मी ऑर्कूट वरती माझ्या फ्रेंडसर्कलमध्ये मला आवडलेल्या , काही वेळा माझ्या कविता पाठवत असतो.


एकदा स्नेहाला [ माझी मैत्रीण ] पाठवलेली कविता वाचून तीने विचारले , काय रे तू चक्क कवी ????केंव्हा झालास ?



उत्‍तरात जे सुचले ती ही कविता !



   !   कवी !

ती मला विचारी
तू कवी केंव्हा झाला
आम्ही तिला कळविल्या
आमच्या कवी अवताराच्या लीला

ती पाहूनिया बाला
आमचा होश उडूनी गेला
आणि अस्मादिकांचा
तेंव्हाच कवी झाला

ऐकूनिया उत्‍तर आमुचे
ती पुढे मला म्हणाली
’ती ’बाला कोण आहे
सर्वांहूनी निराळी

आम्ही पुन्हा कळविले
मातीत येथल्या ती अप्सरा उतरली
क्षितीजाच्या पलीकडे
जशी चांदणी चमकली

परंतु आम्हापुढे ते
एक प्रश्‍नचिन्ह होते
ह्रदय आमुचे ते
तिजला माहितच नव्हते

भावनांना व्यक्‍त करण्या
कविता भला मार्ग आहे
म्हणून या कवीच्या
जन्मास अर्थ आहे !

                 -समीर पु. नाईक

2 comments:

  1. >>>भावनांना व्यक्‍त करण्या
    कविता भला मार्ग आहे >>>
    हे मस्तच जमले आहे...खूप आवडले.

    भरपूर जगा, भरपूर वाचा आणि भरपूर लिहा.

    ReplyDelete
  2. धन्यवाद ! झंप्या ! तुझे स्वागत आहे.तुझी प्रतिक्रिया योग्य आहे , आवडली. संदेशाबद्‍दल धन्यवाद .
    तुलाही शुभेच्छा!

    ReplyDelete