Monday, August 30, 2010

! अलिकडे !

        ! अलिकडे !


टेरेसवरती अलिकडे जेंव्हा मी जातो

टॉवर्सच्या जंगलात हरवून मी बसतो


सुर्योदय आणि सूर्यास्त टॉवर मागेच होतो

चांदोबा सुध्दा आता टॉवर मागे लपतो



टॉवर्स काय कमी होते ,जोडीला होर्डिंग आली

उंच उंच बिल्डिंगांची गर्दी फार झाली



टॉवर म्हणजे यांत्रिक झाड ,कावळा फक्‍त बसे

बाकी पक्षी दिसत नाहीत, गायब झालेत जसे



टॉवर मात्र हवेतच मोबाईलला रेंज

झाडं जरी तोडली तेव्हढाच जरा चेंज



काळ सतत बदलता आहे हे जरी खरं

मूळ कधी विसरू नये लक्षात ठेवा बरं



भौतिक आणि वास्तविक फरक थोडा यात

भौतिकतेची साधनं सुख भासवतात



नितळ सुख फक्‍त आहे निर्मळ त्या प्रेमात

निसर्ग सच्चा सोबती माणसांच्या जंगलात

                                  - समीर पु. नाईक

4 comments:

  1. काय छान कविता करतोस रे तू !!! सही ,मस्तच .

    ReplyDelete
  2. धन्यवाद आणि येथे स्वागत प्रांजली !
    नेहमी भेट देत रहा, शक्यतो दररोज ब्लॉग अपडॆट करण्याचा माझा प्रयत्‍न आहे !
    लोभ असावा
    - समीर पु. नाईक

    ReplyDelete
  3. Sundar.Manatlya sanvedana Pramanikpne wa netkya shabbdat vyakt karne mhanjech Kavita.The form is not of much relavent.

    ReplyDelete
  4. धन्यवाद अनामिक ! :)
    ब्लॉगवर आपले स्वागत !
    अनावधानाने आपल्या प्रतिसादास उत्तर द्यायचे राहिले.!

    ReplyDelete