Thursday, September 9, 2010

तू आलीस जेंव्हा तो क्षण .........

तू आलीस जेंव्हा तो क्षण .........



तू आलीस जेंव्हा ,तो क्षण
मी मनात ठेवलाय जपून


पहाट ओल्या दवाचे कण
निथळतात पाना पानातून



आकाश रिमझिमते भूमीवर
चिंब ,चिंब पाऊस धारांतून



वारा वाहतो असा धुंदलेला
गच्च हिरवटलेल्या रानातून



अग्नीचा नवा बघ प्रकार
तो जळतो फक्‍त विरहातून



रातराणीचा तो मुग्ध गंध
अनूभवतो तुझ्या श्‍वासातून



नव्याने आयुष्याचे आले भान
तुझ्या त्या गुणगुणण्यातून



तू आलीस जेंव्हा ,तो क्षण
मी मनात ठेवलाय जपून

                       - समीर पु.नाईक

5 comments:

  1. जरी तुम्ही रुढार्थाने कवी नसला तरी सुध्धा छान कविता करता. Keep it.

    ReplyDelete
  2. धन्यवाद आणि स्वागत ! सुधीरजी !
    कायम येत रहा!

    ReplyDelete
  3. नमस्कार,
    आपला ब्लॉग मोगरा फुललासोबत http://www.mogaraafulalaa.com/2010/04/marathi-bloggers-2.html या लिंकवर जोडला गेला आहे.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  4. कांचन ताई
    आभारी आहे ,धन्यवाद !

    ReplyDelete
  5. 4:22 AM pranjali gosavi: tu khup sunder lihitos
    4:23 AM khup sunder ahe kavita.....
    me: tulaa aawadalee ka? aawadalee asel tar mi blog war post karato.
    pranjali gosavi: ho khup chhan ahe kar tu post
    4:24 AM kharach kiti chhan suchat tula great

    ReplyDelete